सातारा - जिल्ह्यातील कराडच्या शनिवार पेठेतील कोरोनाबाधित पुरुषाचा आणि सारी आजारामुळे मलकापूर येथील महिलेचा उपचारादरम्यान सोमवारी सकाळी मृत्यू झाला. हे दोन्ही रुग्ण उपचाराकरता क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल होते, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
साताऱ्याच्या कराडमधील कोरोनाबाधितासह एकाचा मृत्यू
सोमवारी सकाळी कराडच्या शनिवार पेठेतील कोरोनाबाधित पुरुषाचा आणि सारी आजारामुळे मलकापूर येथील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हे दोन्ही रुग्ण क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचारार्थ दाखल होते.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. कराड येथील 75 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळून आला होता. तर, रविवारी रात्री मलकापूर (ता. कराड) येथील 85 वर्षीय महिलेला सारीची रुग्ण म्हणून क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दोन्ही रुग्णांचा सर्वसाधारण रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी सकाळी मृत्यू झाला आहे. कोरोना संभाव्य रुग्ण म्हणून उपचारादरम्यान महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले असून तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत, असेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.