कराड (सातारा) -सुपूगडेवाडी (ता. पाटण) येथील राखीव वनक्षेत्रात सशाची शिकार करणाऱ्या दोघांना वनकर्मचाऱ्यांनी अटक केली. त्यांच्याकडून सशाचे मांस आणि शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. शिवाजी रामकृष्ण पाटील आणि रमेश मारुती पाटील (रा. कुठरे, ता. पाटण), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
वनपाल सुभाष राऊत, वनपाल अमृत पन्हाळे, विशाल डुबल, वनरक्षक पाटील, जयवंत बेंद्रे, हंगामी वनमजूर गस्त घालत असताना शिवाजी रामकृष्ण पाटील आणि रमेश मारुती पाटील हे शिकार केलेल्या सशासह रंगेहाथ सापडले.