सातारा: आरोपी पलायनाची घटना सोमवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास घडली. त्यानंतर पोलिसांनी औंध परिसर पिंजून काढून त्यातील दोघांना पुन्हा जेरबंद केले. राहूल भोसले आणि सचिन भोसले अशी दोघांची नावे आहेत. तर अजय भोसले, राहुल ऊर्फ होमराज उध्दव काळे व अवी सुभाष भोसले हे तिघेजण फरार झाले आहेत. पुसेसावळी येथे ११ जानेवारी रोजी दरोडा पडला होता. याप्रकरणातील हे पाच जण संशयित आहेत.
अजय सुभाष भोसले (वय २२, रा. माही जळगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर), सचिन सुभाष भोसले (२३, रा. माही जळगाव, ता. कर्जत), राहुल पदू भोसले (२८, रा. वाजुळ, पारगाव, जि. अहमदनगर), राहुल ऊर्फ होमराज उध्दव काळे (२६, रा. वाकी, ता. आष्टी, जि. बीड) व अवी सुभाष भोसले (२२, रा. माही जळगाव, ता. कर्जत) यांना औंध पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पाचही संशयितांना तीन दिवस पोलीस कोठडी मिळाली होती.