सातारा - प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीजवळ ( Afzal Khan Tomb ) आणखी दोन कबरी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दोन कबरी आढळल्याच्या वृत्ताला प्रशासनाने दुजोरा दिला असून प्रशासन आता त्या कबरींची माहिती ( Information about grave begins ) घेत आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी पुर्वी केवळ अफजलखान ( Afzal Khan ) आणि त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा ( Syed Banda Tomb ) यांच्याच कबरी होत्या. मात्र, अतिक्रमणे काढल्यानंतर त्यांच्या कबरीशेजारी आणखी दोन कबरी ( Two grave ) आढळून आल्याने प्रशासन हडबडून गेले आहे.
कबरींची माहिती घेण्यास सुरूवात -अफजलखान कबरीच्या परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त केल्यानंतर शिवप्रेमींमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. अतिक्रमणे हटविल्यानंतर अफजलखान कबरीचा परिसर पुर्णपणे मोकळा झाला आहे. त्यामुळे अफजलखान आणि सय्यद बंडा यांच्या कबरींशेजारी अजून दोन कबरी असल्याचे निदर्शनास आले. यामुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दोन कबरींपैकी एक कबर अफजलखान आणि सय्यद बंडा यांच्या कबरीशेजारी आहे, तर दुसरी कबर अतिक्रमण काढण्यात आलेल्या जागेत आहे. प्रशासनाने या कबरींबद्दलची माहिती घेण्यास ( Information about grave begins ) सुरूवात केली आहे.