महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाळू उपश्यावरुन झालेल्या मारामारीत दाेघांचा मृत्यू; माण तालुक्यातील खूनाचा प्रकार - Two killed in fight in man

नरवणे (ता. माण) येथे वाळू उपशाच्या कारणातून वाळू तस्करांच्या दोन गटात झालेल्या तुंबळ मारामारीत दाेघांचा मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले.

crime
crime

By

Published : Mar 17, 2021, 9:36 PM IST

Updated : Mar 17, 2021, 10:04 PM IST

सातारा - नरवणे (ता. माण) येथे वाळू उपशाच्या कारणातून वाळू तस्करांच्या दोन गटात झालेल्या तुंबळ मारामारीत दाेघांचा मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले. चंद्रकांत नाथा जाधव व विलास धोंडीबा जाधव अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत.

वाळू उपश्यावरुन झालेल्या मारामारीत दाेघांचा मृत्यू

मृत परस्परविरोधी गटातील

खुनाची घटना घडल्यानंतर संपुर्ण गावात तणावपूर्ण शांतता होती. ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवले. आज सकाळी नरवणे येथे वाळू उपश्याच्या कारणातून वाळू तस्करांच्या दोन गटांमध्ये तुंबळ मारामारी झाली. यामध्ये तलवारीने जबरी वार होऊन जखमी झालेले चंद्रकांत नाथाजी जाधव व विलास धोंडीबा जाधव यांचा मृत्यू झाला. दोघेही परस्पर विरोधी गटातील आहेत. तीन जण गंभीर जखमी आहेत.

हेही वाचा -अँटिलिया प्रकरण : सचिन वाझेंना घेऊन 'एनआयए'चे पथक घटनास्थळी

वाळू लिलावावरुन दोघांत वाद

तहसीलदार बाई माने यांनी नरवणे येथे जप्त केलेल्या वाळूचा लिलाव 22 फेब्रुवारी रोजी केला होता. पाच ब्रास वाळूचे चंद्रकांत जाधव यांनी 33 हजार रुपये भरले होते. व लिलाव घेतला होता. दरम्यान चंद्रकांत नाथाजी जाधव हे बेकायदा वाळू उपसा करत आहेत, अशी तक्रार विलास धोंडीबा जाधव यांनी तलाठ्याकडे केली होती. त्यातूनच वाद वाढत गेला व आज सकाळी साडेदहाच्या सुमारास चंद्रकांत व विलास जाधव यांच्या गटात तुंबळ मारामारी झाली. या घटनेत दाेघांना आपला प्राण गमवावा लागला. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट

याबाबत दहिवडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, सहायक निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी भेट दिली. आरोपी निष्पन्न करण्याचे काम सुरू आहे. लवकरच याप्रकरणातील संशयितांना अटक करण्यात येईल, असे अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी सांगितले. डाॅ. निलेश देशमुख व राजकुमार भुजबळ तपास करत आहेत.

हेही वाचा -चारच दिवसात शेअर बाजार गुंतवणुकदारांनी गमाविले ५.५ लाख कोटी!

Last Updated : Mar 17, 2021, 10:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details