सातारा - वाईत गांजा शेती करून जिल्ह्यात खळबळ उडवून देणार्या दोघा जर्मन नागरिकांनी जिल्हा कारागृहात धुमाकूळ घातला. कारागृहातील सीसीटीव्ही व शौचालयाच्या दरवाजाची मोडतोड केली. विवस्त्र होवून कारागृहात कर्मचार्यांशी असभ्य वर्तन केले. याप्रकरणी कारागृहातील हवालदार सुरेश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बंगल्यातच पिकवला होता गांजा
पोलिसांकडून मिळालेल्याा माहितीनुसार, वाई शहरातील नंदनवन कॉलनीतील 'विष्णू श्री स्मृती' या बंगल्यात हायड्रोपोनिक ग्रो सिस्टीमचा वापर करून बंगल्याच्या तीन बेडरूममध्ये, गॅलरीत, टेरेसवर कुंड्यामध्ये गांजाची लागवड केली होती. पोलिसांनी 29 किलो गांजा इतर साहित्य असा एकूण ८ लाख 21 हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्गीस व्हिक्टर मानका (वय 31 वर्षे), सेबेस्टीन स्टेन मुलर (वय 25 वर्षे, दोघे रा.जर्मनी, सध्या रा. नंदनवन कॉलनी, वाई) या संशयितांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती.