सातारा -कोरेगाव रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा सत्र न्यायालय दरम्यानच्या ओढ्यात कार कोसळल्याची घटना घडली. यात घटनेत कोल्हापूरचे दोन जण ठार तर एक जण जखमी झाला आहे. अनिकेत कुलकर्णी (वय २८, मंगळवार पेठ, कोल्हापूर) व आदित्य घाटगे (वय २३, कसबा बावडा) अशी मृतांची नावे आहेत. तर, देवराज माळी (वय २१, कसबा बावडा) हा गंभीर जखमी झाला आहे.
साताऱ्यातील ओढ्यात कार कोसळली; कोल्हापूरचे दोन ठार, एक जखमी - Aditya Ghatge died in an accident
कोरेगाव रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा सत्र न्यायालय दरम्यानच्या ओढ्यात कार कोसळल्याची घटना घडली. यात घटनेत कोल्हापूरचे दोन जण ठार तर एक जण जखमी झाला आहे.
दोन्ही युवक जागीच ठार
काल मध्यरात्री कोल्हापूरचे हे युवक पोवई नाक्याकडून कोरेगावच्या दिशेने कारने जात होते. दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने भारधाव कार जिल्हा न्यायालयालगतच्या ओढ्यात कोसळली. सुमारे ३० फूट खोल ओढ्यात कार कोसळल्याने दोघे जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच सातारा पोलीस आणि रिक्षाचालकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. रात्रीच्या अंधारात ओढ्यात उतरून सर्वांना बाहेर काढण्यात आले. सर्वांना सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी अनिकेत कुलकर्णी व आदित्य घाटगे यांना मृत घोषित केले. जखमी देवराज माळी याच्यावर उपचार सुरू आहेत. सातारा पोलीस अधिक तपास करत आहे.
हेही वाचा -पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ : क्रीडा मंत्री सुनिल केदार