सातारा- वाई परिसरातील घरफोडी, चोरी करणाऱ्या टोळीतील 5 व वडूज येथील बेकायदा पिस्तूल दाखवत खंडणी उकळणाऱ्या टोळीतील 2 असे 7 जणांना तडीपार करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी दिली.
वाईच्या टोळीचा प्रमुख आकाश शिवाजी वागले जाधव (वय 28 वर्षे, रा. गुलमोहर कॉलनी, वाई), किरण रामसिंग घाडगे (वय 21 वर्षे), भुपाल किसन घाडगे (वय 40 वर्षे), कैलास भानुदास काळे (वय 28 वर्षे, तिघेही रा. सैदापूर ता सातारा), राहुल अमर घाडगे (वय 18 वर्षे, रा. लाखानगर, वाई) या टोळीला पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी वाई, महाबळेश्वर, जावळी आणि खंडाळा या 4 तालुक्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे.
हेही वाचा - कराडमध्ये 'विजय दिवस' समारोहाला सुरुवात, सोमवारी थरारक प्रात्यक्षिके