कराड(सातारा) - एकाच दिवसात कराड तालुक्यातील दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे प्रशासन हादरले आहे. ते नागपूर आणि पुणे येथून गावी आले होते. कराड तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चार झाली आहे. दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे.
कराड तालुक्यातील आणखी दोघे कोरोना पॉझिटिव्ह - karad satara
कराड तालुक्यातील चरेगाव आणि बाबरमाची या कोरोनाबाधित रुग्णांच्या गावातील रस्ते पोलिसांनी सील केले आहेत.
corona karad
कराड तालुक्यातील चरेगाव आणि बाबरमाची या कोरोनाबाधित रुग्णांच्या गावातील रस्ते पोलिसांनी सील केले आहेत. तालुक्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण बरा झाल्यानंतर शनिवारी टाळ्यांच्या गजरात त्याला निरोप देण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दोन रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासन आता अधिक सतर्क झाले आहे.