महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ह्रदयद्रावक! वीज वाहिनीचा शॉक लागून शेळ्या चारताना दोन मुलांचा मृत्यू, तिघे बचावले!

शेळ्यांना चारा आणण्यासाठी निघालेल्या दोन मुलांचा वीज कंपनीच्या लघुदाब वाहिनीचा शॉक लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना वाई तालुक्यातील भुईंज परिसरातून समोर आली आहे. साहिल लक्ष्मण जाधव (वय ९) आणि प्रतिक संजय जाधव (वय १५), अशी त्यांची ( two kids death due to electricity shock ) नावे आहेत.

मृत मुले
मृत मुले

By

Published : Oct 3, 2022, 8:48 AM IST

सातारा - शेळ्यांना चारा आणण्यासाठी निघालेल्या दोन मुलांचा वीज कंपनीच्या लघुदाब वाहिनीचा शॉक ( low pressure line of the electricity company ) लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना वाई तालुक्यातील शिरगाव ( shock incident in ​​shirgaon ) गावात घडली. साहिल लक्ष्मण जाधव (वय ९) आणि प्रतिक संजय जाधव (वय १५), अशी त्यांची नावे आहेत. या घटनेतून तीन मुले सुदैवाने बचावली आहेत.

शेळ्यांना चारा आणण्यासाठी निघालेल्या दोन मुलांचा वीज कंपनीच्या लघुदाब वाहिनीचा शॉक लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना वाई तालुक्यातील भुईंज परिसरातून समोर आली आहे. साहिल लक्ष्मण जाधव (वय ९) आणि प्रतिक संजय जाधव (वय १५), अशी त्यांची ( two kids death due to electricity shock ) नावे आहेत. या घटनेतून तीन मुले सुदैवाने बचावली आहेत. या घटनेमुळे शिरगाव (ता. वाई) गावावर शोककळा पसरली आहे.



ओढ्यात पडलेल्या वीज वाहिनीचा लागला शॉकशिरगाव गावच्या हद्दीतील कुंभारखाणी शिवारात वाघाचा मळा येथून महाराष्ट्र राज्य वीज कंपनीची लघुदाब लाईन गेली आहे. ती तुट्रन ओढ्यातील वाहत्या पाण्यात पडली होती. शेळ्यांना चारा आणण्यासाठी साहिल लक्ष्मण जाधव आणि प्रतिक संजय जाधव हे ओढ्यातून जात असताना त्यांना विजेचा शॉक लागला. दोघांनाही तातड़ीने भुईज प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि तेथून सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांना नेण्यात आले. मात्र त्या दोघांचा मृत्यू झाला होता.

भुईंज पोलिसांची घटनास्थळी धाववीजेचा शॉक लागून दोन मुले गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळताच भुईज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशिष कांबळे, निवास मोरे, शिवाजी तोडरमल, बापूसाहेब धायगुडे, आनंदराव भोसले, विजयराव देशमुख, शंकर घाडगे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वीज कंपनीच्या हलगर्जीपणाबद्दल नागरीक संतप्त झाले होते. मात्र, पोलिसांनी नागरीकांना शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

ABOUT THE AUTHOR

...view details