सातारा:हे दोघे मित्र कोरेगाव येथील अनन्या रेसिडेन्सीमधील तिसऱ्या मजल्यावर राहण्यास होते. एका मुलाने स्वत:ला पेटवून घेतले आहे. तर दुसऱ्या मुलाने आत्महत्या केली आहे. ऋषिकेश राजेंद्र ताटे (रा. बोधेवाडी, ता. कोरेगाव) आणि सुभाषकुमार सूरज प्रसाद (मूळ रा. कानपूर, उत्तर प्रदेश, सध्या रा. कोरेगाव), अशी त्यांची नावे आहेत. तसेच खटाव तालुक्यातील तडवळे गावात नऊ वर्षाच्या मुलीचा झोका खेळताना फास लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
फ्लॅटमधून आगीच्या ज्वाळा : रोहन राजेंद्र ताटे ही आई, भाऊ, आत्या यांच्यास अनन्या रेसिडेन्सी इमारतीत भाड्याने राहतात. त्यांच्या वाठार स्टेशन येथील हॉटेलमध्ये सुभाषकुमार सुरज प्रसाद हा कामाला होता. ताटे यांच्या बोधेवाडी गावच्या यात्रेसाठी तो गेला होता. जेवण करून तो आणि ऋषिकेश कोरेगावला आले. मध्यरात्री फ्लॅटमधून आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना दिसल्या. आगीच्या ज्वाळा पाहून शेजाऱ्यांनी आग विझवली. फ्लॅटचा दरवाजा तोडून लोक आतमध्ये गेले असता हॉलमध्ये सुभाषकुमार हा आत्महत्या केलेल्या अवस्थेत तर बेडरूममध्ये ऋषिकेश होरपळलेल्या अवस्थेत दिसून आला. या घटनेमुळे कोरेगावात उलटसुलट चर्चा सुरू आहे. तसेच आणखी एक घटना घडली आहे. खटाव तालुक्यातील तडवळे गावात हृदयद्रावक घटना घडली आहे. लोखंडी पाईपला साडी बांधून झोका खेळत असताना फास लागून नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. घरात झोका खेळता-खेळता मुलीची मान साडीमध्ये अडकून गळ्याला फास लागला आहे. फास सोडवून कुटुंबीयांनी तिला तातडीने वडूज रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला आहे.