सातारा- सातारा तालुक्यातील वाढे गावच्या हद्दीत एका हॉटेलचालकाला लुटल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत हॉटेलचालकाच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चैन आणि आठ हजार रुपयांचा मोबाईल असा ६८ हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आले आहे. या प्रकरणी चौघांवर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.
हे आहेत संशयित
पोलिसांनी संशयितांपैकी दोघांना अटक केली आहे. सहभागी पैकी एक जण अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. लूटमार करणाऱ्यांमध्ये एक जण अनोळखी असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. सौरभ मंडलिक आणि शेखर सर्वगौड अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहे.
अशी झाली लुट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयूर चंद्रकांत देशमुख (वय 25, निसराळे ता. सातारा) हा हॉटेल व्यवसायिक आहे. रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून निघाला होता. त्याला वाढे गावच्या हद्दीत असणार्या पुलाच्या पुढे सौरभ पोपट मंडलिक, शेखर रवींद्र सर्वगौड, एक अल्पवयीन मुलगा आणि लाल रंगाचा शर्ट घातलेला एक अनोळखी मुलगा अशा चौघांनी अडवले. त्यांनी मयूरला धक्काबुक्की, शिवीगाळ व दमदाटी केली. चौघांनी त्याच्या हातातील आठ हजार रुपये किंमतीचा मोबाईल, मोटार सायकलची चावी आणि गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून घेत पळ काढला.
हॉटेल चालकाला लुटणाऱ्या दोघांना अटक - सातारा लेटेस्ट न्युज
मयूर चंद्रकांत देशमुख (वय 25, निसराळे ता. सातारा) हा हॉटेल व्यवसायिक आहे. रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून निघाला होता. त्याला वाढे गावच्या हद्दीत असणार्या पुलाच्या पुढे सौरभ पोपट मंडलिक, शेखर रवींद्र सर्वगौड, एक अल्पवयीन मुलगा आणि लाल रंगाचा शर्ट घातलेला एक अनोळखी मुलगा अशा चौघांनी अडवले.
अल्पवयीन मुलाची सुधारगृहात रवानगी
याप्रकरणी मयूर देशमुख यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला. पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये सहभागी असणाऱ्या संशयीतांची नावे समोर आली होती. त्यानुसार शोध घेत पोलिसांनी सौरभ पोपट मंडलिक आणि शेखर रवींद्र सर्वगौड याला अटक केली आहे. दरम्यान तिसऱ्या संशयितालाही या वेळी ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र तो अल्पवयीन असल्यामुळे त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
हेही वाचा-मौजमजेसाठी अल्पवयीन चोरट्याने लंपास केल्या आठ दुचाकी