महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा : अंडी उधार दिली नाहीत म्हणून दुकानदाराचा खून, आरोपी स्वतः झाले पोलिसांसमोर हजर

अंडी उधार दिली नाहीत म्हणून दोघांनी दुकानदाराचा दगड व धारदार शस्त्राने खून केला. त्यानंतर स्वतः पोलिसांसमोर हजर झाले. ही घडना शुक्रवारी (दि. 18 डिसें.) रात्री उशीरा घडली.

अंडी
अंडी

By

Published : Dec 19, 2020, 7:54 PM IST

Updated : Dec 19, 2020, 10:24 PM IST

सातारा - अंडी उधार दिली नाहीत म्हणून चिडून बोगदा परिसरातील पाॅवर हाऊसजवळ एकाचा दगड व धारदार हत्याराने खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोन युवकांना अटक केली असून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.

न्यायालयातून आरोपींना नेताना

संशयितांचे आत्मसमर्पण

बबन हणमंत गोखले (वय 42 वर्षे, रा. मंगळवार पेठ), असे मृत दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी शुभम जयराम कदम (वय-20 वर्षे) व सचिन प्रताप माळये (वय-20 वर्षे, दोघेही रा. 446, पॉवर हाऊस, मंगळवार पेठ, सातारा), अशी संशयित आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी (दि. 18 डिसें.) रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्यासुमारास पाॅवर हाऊससमोरील टपरीजवळ हा प्रकार घडला. बबन गोखले यांच्या खुनानंतर भानावर आलेल्या दोन्ही संशयितांनी स्वतःहून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

दुकानाला कुलुप लावून येतो म्हणत बबन घराबाहेर पडले अन् परतलेच नाही

अलका बबन गोखले (वय 37 वर्षे) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, बबन गोखले यांचे पॉवर हाऊसजवळ यवतेश्वर रस्त्याच्या बाजूला स्नॅक्सचे टपरीवजा दुकान आहे. शुक्रवारी (दि. 18 डिसें.) रात्री बबन दुकान बंद करुन घरी गेले असता साडेदहा वाजण्याच्या दुकानाचे कुलुप उघडे आहे, असा सुमारास फोन आला. मी दुकानाला कुलुप लावुन येतो, असे पत्नीला सांगून गोखले बाहेर पडले. तो परत घरी गेले नाही. पहाटे 3 वाजता पोलिसांनी बबन गोखलेंच्या घराचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर कुटुंबियांना खूनाची घटना समजली.

संशयीत आरोपी निघाले होते हत्यारासह पोलीस ठाण्याला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा शाहूपुरी पोलिसांना खुनाचा प्रकार समजला. घटनास्थळी पोलीस येत असताना अटकेत असलेले संशयित भेटले. त्यांनीच घडलेल्या प्रकाराची माहीती देण्यासाठी पोलीस ठाण्याला येत असल्याचे सांगतिले. तसेच दगड व धारदार शस्त्राने खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

चार दिवसांची कोठडी

पोलिसांच्या अटकेत असलेल्या दोन्ही संशयितांना शनिवारी (दि. 19 डिसें.) सायंकाळी येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांची चार दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

हेही वाचा -शासनामार्फत फक्त प्रतापगडावर साजरा होणार शिवप्रताप दिन; इतर ठिकाणचे कार्यक्रम रद्द

हेही वाचा -समर्थ मंदिर जवळ झालेला खून पुर्व वैमनस्यातून; चौघांना पोलीस कोठडी

Last Updated : Dec 19, 2020, 10:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details