कराड (सातारा) -कराड तालुक्यातील आणे गावचा सुपूत्र तुषार उत्तमराव देसाई याने युपीएससी परीक्षेत बाजी मारली आहे. त्याने 224 वी रँक मिळवली आहे. सध्या तो भोपाळ (मध्य प्रदेश) येथे नाबार्डमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आहे.
हेही वाचा -नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्वधर्मीय धार्मिकस्थळं होणार खुली; मुख्यमंत्र्यांचा निर्णय
- 224 वी रँक मिळवून युपीएससी परीक्षेत यश -
तुषार देसाई याचे प्राथमिक, माध्यमिक तसेच बारावीपर्यंतचे शिक्षण कराडमधील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात पूर्ण झाले. त्यानंतर पुणे येथील एसईओपी कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. नाबार्डमध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून तो भोपाळमध्ये नोकरीस आहे. या दरम्यान त्याने युपीएससी परीक्षेची तयारी केली होती. 224 वी रँक मिळवून त्याने युपीएससी परीक्षेत यश मिळविले आहे.
तुषार याचे वडील उत्तमराव देसाई हे कराडच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागात शाखा अभियंता आहेत. दोन वर्षापुर्वी तुषारचा मावस भाऊ गिरीश यादव हा देखील युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला होता. तामिळनाडू केडरमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून त्याची निवड झाली असून सध्या त्याचे प्रशिक्षण सुरू आहे.
हेही वाचा -UPSC 2020 RESULT मुंबई आयआयटीचे विद्यार्थी शुभम कुमार देशात प्रथम; 761 उमेदवार उत्तीर्ण