महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या ट्रकला आग - सातारा जिल्हा लेटेस्ट न्यूज

कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात पेट्रोलपंपासमोर उभा असलेल्या ट्रकला अचानक आग लागली. या आगीत ट्रक जळून खाक झाला आहे. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

आगीत ट्रक जळून खाक
आगीत ट्रक जळून खाक

By

Published : Mar 17, 2021, 5:41 PM IST

कराड -कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात पेट्रोलपंपासमोर उभा असलेल्या ट्रकला अचानक आग लागली. या आगीत ट्रक जळून खाक झाला आहे. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

आगीत ट्रक जळून खाक

कराड-मलकापूर-नांदलापूर मार्गावर बैलबाजार परिसरात बाजार समितीचा पेट्रोल पंप आहे. या पंपासमोर प्लॅस्टिकचा कचरा भरलेला ट्रक उभा होता. या ट्रकला अचानक आग लागली. ट्रक पेटल्याचे लक्षात येताच पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र प्लॅस्टिकमुळे आग भडकल्याने अखेर अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले, अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. या घटनेत ट्रक जळून खाक झाला, मात्र अद्याप आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.

आगीत ट्रक जळून खाक

हेही वाचा -मुंबईत सध्या लॉकडाऊन लागू करण्याची गरज नाही, परंतु लादले जाणार कठोर निर्बंध - अस्लम शेख

ABOUT THE AUTHOR

...view details