सातारा - दहिवडी येथील सिद्धनाथ मंगल कार्यालयाशेजारी पालात राहणाऱ्या भटक्या नागरिकांवरती उपासमारीची वेळ आली आहे. नुकतीच प्रसूती झालेल्या एका महिलेचे अन्नाविना हाल होत आहेत. त्यांची शासनाने ताबडतोब दखल घ्यावी आणि त्यांच्या अन्न धान्याची व्यवस्था करावी, अशी मागणी समय संस्थेचे प्रतिनिधी व माजी सभापती बाळासाहेब रणपिसे, सचिन लवटे, भारती पवार यांनी केली.
पालांमध्ये राहणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची वेळ; प्रसूती झालेल्या महिलेचे अन्नाविना हाल - Dahiwadi Lockdown
दहिवडी येथे सिद्धनाथ मंगल कार्यालया शेजारी डवरी, गोसावी, कंजारभाट, वीट-भट्टी कामगार, बाळगोपाळ, नेवाती, पारधी, वैदू , लोहार इत्यादी भटक्या जातींची सुमारे ७० ते ८० कुटुंबं वास्तव्याला आहेत. सध्या या ठिकाणी एका प्रसूती झालेल्या महिलेचे अन्ना वाचून हाल होत असल्याचे समजताच समय संस्थेने त्या ठिकाणी पाहणी केली. त्यांनी महिलेला आवश्यक गोष्टींची मदत केली.
दहिवडी येथे सिद्धनाथ मंगल कार्यालया शेजारी डवरी, गोसावी, कंजारभाट, वीट-भट्टी कामगार, बाळगोपाळ, नेवाती, पारधी, वैदू , लोहार इत्यादी भटक्या जातींची सुमारे ७० ते ८० कुटुंबं वास्तव्याला आहेत. सध्या या ठिकाणी एका प्रसूती झालेल्या महिलेचे अन्ना वाचून हाल होत असल्याचे समजताच समय संस्थेने त्या ठिकाणी पाहणी केली. त्यांनी महिलेला आवश्यक गोष्टींची मदत केली. या नागरिकांकडे रेशनकार्ड नाही त्यामुळे धान्य मिळत नाही. सध्या लॉकडाऊनमुळे रोजगार नाही परिणामी या नागरिकांची उपासमार होत आहे.
या ठिकाणी कर्नाटक, तेलंगाणा या राज्यातील व पुणे, जालना, सातारा, सोलापूर, वाशीम या जिल्ह्यातील नागरिक आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांना त्यांच्या मूळ गावी परत जाता येत नाही, असे त्यांनी सांगितले आहे. या सर्व कुटुंबातील व्यक्तींच्या अन्नाधान्याची व्यवस्था करावी, अशी मागणी बाळासाहेब रणपिसे यांनी केली आहे.