सांगली - श्री संत नामदेव शिंपी समाज सुधारक मंडळ शिराळा यांच्यावतीने आज (रविवारी) शिराळ्यातील स्मशानभूमीमध्ये स्वच्छता करून, वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी शिराळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी योगेश पाटील, नगराध्यक्षा अर्चना शेटे यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी पाटील म्हणाले, संत नामदेव पुण्यतिथीचे औचित्य साधून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन असल्याने सुरक्षीत अंतर राखून, शिराळा नगरितील शिंपी समाजाने पुढाकार घेऊन वृक्षारोपणाचा विशेष उल्लेखनीय कार्यक्रम केला आहे.
संत नामदेव महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधून शिराळा शहरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम
श्री संत नामदेव शिंपी समाज सुधारक मंडळ शिराळा यांच्यावतीने आज (रविवारी) शिराळ्यातील स्मशानभूमीमध्ये स्वच्छता करून, वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी शिराळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी योगेश पाटील, नगराध्यक्षा अर्चना शेटे यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.
यावळी समाजसेवक बसवेश्वर शेटे, दिपक पाटील, वनक्षेत्रपाल बाळकृष्ण खुर्द, मनोहर नाझरे, राजाराम खुर्द, वसंत मिरजकर, दिलीप मिरजकर, ज्ञानेश्वर मिरजकर, लक्ष्मण खुर्द यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
नगराध्यक्षा अर्चना शेटे म्हणाल्या, शिंपी समाज बांधवांनी स्मशानभूमी भोवती वृक्षारोपण करून शिराळा नगरीत आदर्श घालून दिला आहे. भविष्यातही स्मशानभूमी स्वच्छ व सुंदर होईल. याचे योगदान कौतुकास्पद आहे. तसेच त्यांनी पाणी पुरवठा करण्याचे त्यांनी आश्वासन यावेळी दिले. संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून छोटासा कार्यक्रम सोशल डिस्टन्सिंग पाळून नाझरे वाड्यामध्ये पार पडला. यावेळी समाजाचे उपाध्यक्ष दिपक मिरजकर, विलास खुर्द, प्रशांत खुर्द, दिलीप नाझरे, दिनेश खुर्द,अनिल खुर्द, नामदेव वेल्हाळ, नामदेव खुर्द, राहूल मिरजकर, जयेश मिरजकर, संजय मिरजकर, शरद खुर्द, विशाल खुर्द, बाळासाहेब भस्मे, गणेश मिरजकर, प्रथमेश नाझरे, पुरुषोत्तम मिरजकर, आदित्य नाझरे, सोहन मिरजकर, सूरज कोळेकर, रविंद्र खुर्द, धनंजय कोळेकर, सुशांत खुर्द, संजय जाधव, विजय जाधव, दिनेश हसबनिस, प्रकाश शिंदे उपस्थित होते.
TAGGED:
श्री संत नामदेव पुण्यतिथी शिराळा