सातारा -शहरात कृष्णानगर येथे जलसंपदा कार्यालयासमोर वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून पोलिसांनी घुबड व मांडूळ हस्तगत केले. या वन्यजीवांची किंमत १० लाख रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे. अनिकेत शंकर यादव (२१ रा. कृष्णानगर वसाहत, सातारा) असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
साताऱ्यात घुबड आणि मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या तरुणाला अटक हेही वाचा... मध्य प्रदेश : मुले चोरीच्या संशयावरून सहा शेतकऱ्यांना मारहाण, एकाचा मृत्यू
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जहाड व त्यांच्या पथकाला सातारा-कोरेगाव रस्त्यावर एक युवक संशयास्पदरित्या हातात पिशवी घेऊन उभा असलेला दिसला. अधिक चौकशी केल्यानंतर तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याच्या जवळ असलेल्या पिशवीमध्ये मांडूळ (तपकिरी रंगाचा सर्प) व घुबड आढळले.
हेही वाचा... मलबार हिल येथील लॅसपालमास इमारतीला आग; आठ जणांची सुखरुप सुटका
या युवकाची पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्याने काळ्या बाजारात या वन्यजीवांची चांगली किंमत येते म्हणून विक्रीसाठी पकडले असल्याची कबुली दिली. या दोन्ही जीवांसाठी १० लाख रुपये किंमत असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी मांडुळ व घुबड पक्षी वनविभागाच्या ताब्यात दिले आहे. तसेच युवकावर वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.