सातारा: आज सकाळपासून प्रवास करणार्या नागरिकांना खंबाटकी घाटात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. सकाळपासून घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सुट्टी प्लॅन करून फिरायला जाण्यासाठी लोक मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहतूकीची कोंडी होऊन खंबाटकी घाटातील वाहतूक संथ झाली आहे.
खंबाटकी घाटात वाहतूकीची कोंडी : शनिवार, रविवार आणि नंतर स्वातंत्र्य दिन, पारशी दिन, अशा सलग सुट्ट्यांमुळे फिरायला जाण्यासाठी लोक घराबाहेब पडले आहेत. त्यामुळे महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. पुणे-सातारा मार्गावरील वाहतूक सकाळपासून संथ गतीने सुरू आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनांच्या रांगा लागल्याचेही चित्र आहे. वाहनांचा वेग मंदावल्याने घाटातून वर येण्यासाठी खूप वेळ लागत आहे.
पर्यटनस्थळे पुन्हा गजबजली : जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे सातारा जिल्ह्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळांकडे जाणार्या मार्गांवर दरडी कोसळत होत्या. त्यामुळे प्रशासनाने महाबळेश्वर, कास, वाई, पाचगणी, कोयनानगर या भागातील पर्यटनस्थळी जाण्यास पर्यटकांना मनाई केली होती. त्याचा मोठा परिणाम पर्यटनावर झाला होता. आता पावसाने विश्रांती घेतली आहे. तसेच दरडींचा धोकाही टळला आहे. त्यामुळे पर्यटनस्थळे पुन्हा गजबजू लागली आहेत. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे फिरायला जाण्याचा प्लॅन करून लोक मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत.