सातारा -शिंगणापूर-नातेपुते मार्गावरील भवानी घाटात आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात विजय सावंत (रा.आसू-पवारवाडी, ता.फलटण) हा ट्रॅक्टर चालक जखमी झाला आहे. तर ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर घाटात ट्रॅक्टरला अपघात, चालक जखमी - natepute
सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर-नातेपुते मार्गावरील भवानी घाटात ट्रॅक्टरला अपघात झाला.
कोरटकर (रा.गुरसाळे, ता.माळशिरस) यांच्या मालकीचा ट्रॅक्टर पिंगळी (ता.माण) चारा छावणीसाठी चारा घेऊन गेला होता. चारा खाली करुन परत येत असताना हा ट्रॅक्टर शिंगणापूर-नातेपुते मार्गावरील भवानी घाटातील वळणावरील सरंक्षण कठडा तोडून ट्रॉलीसह सुमारे २० फूट खोलीवर दुसऱ्या वळण रस्त्यावर पडला. यामध्ये ट्रॅक्टरचालक सावंत हे जखमी झाले. सध्या त्याच्यावर अकलूज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात ट्रॅक्टर आणि ट्रॉलीचे सुमारे ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे समजते.