सातारा -जिल्ह्याच्या जावळी तालुक्यातील गवडी व माण तालुक्यातील बनवडी तेथील दोन कोरोनाबाधित महिलांची प्रसूती झाली आहे. ती दोन्ही बाळं सुखरुप व लक्षणे विरहीत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
साताऱ्यात दोन कोरोनाबाधित स्त्रियांची प्रसूती, बाळं सुखरुप; एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू - satara corona news
येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधरण रुग्णालयात दाखल असणाऱ्या दोन कोरोनाबाधित गर्भवती महिलांची प्रसूती झाली. सध्या दोन्ही बाळ व माता या सुखरुप असून दोन्ही बाळांची कोरोनाविरहित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली.
येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधरण रुग्णालयात दाखल असणाऱ्या जावळी तालुक्यातील गवडी येथील कोरोनाबाधित 26 वर्षीय गरदोर महिलेची प्रसूती 30 मे रोजी झाली. सध्या बाळ व आई सुखरुप असून बाळाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच आज तिला डिस्चार्ज देण्यात येणार आहे. याच रुग्णालयात दाखल असणाऱ्या माण तालुक्यातील बनवडी येथील कोरोनाबाधित 25 वर्षीय गरदोर महिलेची बुधवारी सकाळी सुरक्षित प्रसूती झाली आहे. बाळ व आई सुखरुप असून बाळाची लक्षणे विरहीत आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुनिल एम. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत.
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात गिघेवाडी (ता.कोरेगाव) येथील कोरोनाबाधित ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याला उच्च रक्तदाब व श्वसन संस्थेचा त्रास होता. तर, बुधवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार सातारा शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल असणाऱ्या कोल्हापूर येथील 39 वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोनाबाधित आल्याचे खासगी प्रयोगशाळेने कळविले आहे.