सातारा- महाबळेश्वर वेण्णा लेक परिसरातील तलावात 1 पर्यटक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या ठिकाणी 4 मित्र नौकाविहार करत असताना त्यातील एकजण तलावात पडून बेपत्ता झाला. या ठिकाणी सह्याद्री ट्रेकर्स, महाबळेश्वर पोलीस प्रशासन, बेपत्ता पर्यटकाचा शोध घेत आहेत. महेश दादासो रिते (वय 30 रा. जामखेड, जि. अहमदनगर), असे या बेपत्ता झालेल्या पर्यटकाचे नाव आहे.
महाबळेश्वर: वेण्णा लेक परिसरातील तलावात पर्यटक बेपत्ता, शोधकार्य सुरू - नौका विहार
महाबळेश्वर वेण्णा लेक परिसरातील तलावात 1 पर्यटक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.
महाबळेश्वर: वेण्णा लेक परिसरातील तलावात पर्यटक बेपत्ता, शोधकार्य सुरु
याबद्दल अधिक माहिती अशी की, महेश दादासो रिते हा तलावात बेपत्ता झाला आहे. अहमदनगरवरून महाबळेश्वर येथे 4 मित्र फिरण्यासाठी आले होते. ते दुपारी नौकाविहार करण्यासाठी वेण्णा लेक परिसरात बोट भाड्याने घेऊन गेले. त्यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही काळजी न घेतल्याने नौका विहार करत असताना एक पर्यटक पाण्यात पडला. त्यानंतर तो बेपत्ता झाला.