सातारा- जिल्ह्यात आणखी ६ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणाऱ्या 6 नागरिकांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांची संख्या 247 वर पोहोचली आहे.
सातारा जिल्ह्यात आणखी ६ जणांना कोरोनाची लागण, एकूण संख्या २४७ वर - सातारा कोरोना न्यूज
जिल्ह्यात आणखी ६ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणाऱ्या 6 नागरिकांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
म्हासोली (ता. कराड) येथील 1 मुलगी (वय 15), 1 पुरुष (वय 71 ), ढेबेवाडी फाटा (ता. कराड) येथील 1 मुलगी (वय 18), 1 युवक (वय 23), 1 महिला (वय 44) गलमेवाडी कुंभारगाव (ता. पाटण) येथील 1 युवती (वय 24) असे एकूण 6 जणांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. तसेच 14 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
139 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीला पाठवले असून क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, येथील 20, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 44, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 11, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 54, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 2 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 8 असे एकूण 139 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ही 247 झाली आहे. यापैकी उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या ही 127 इतकी असून कोरोनामुक्त होऊन घरी गेलेली रुग्णसंख्या 114 आहे. तर मृत्यू झालेले 6 रुग्ण आहेत.