महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यात सोमवारी 474 नवे कोरोनाबाधित; चौघांचा मृत्यू - satara corona news

सातारा जिल्ह्यात आणखी चार जणांचा कोरोनाने बळी घेतला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या एक हजार 902 झाली आहे.

satara corona
सातारा रुग्णालय

By

Published : Mar 29, 2021, 9:41 PM IST

सातारा - जिल्ह्यात आणखी चार जणांचा कोरोनाने बळी घेतला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या एक हजार 902 झाली आहे. काल रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 474 नागरिकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

गेल्या चार दिवसात कोरोनाच्या बाधितांचा रोजचा आकडा 400 पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे प्रशासनापुढे चिंता वाढू लागली आहे. या बाधितांमध्ये सातारा तालुक्‍यातील सर्वाधिक रुग्ण आहेत, अशी माहिती शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा -'पंतप्रधानांना बांग्लादेशात कोणत्या जेलमध्ये ठेवले होते?'

सातारा तालुका 107, खटाव तालुका 81, कोरेगाव 43, वाई 41, कराड व जावळी प्रत्येकी 31, महाबळेश्वर 32, पाटण 29, माण 29 व फलटण 28 अशा रुग्णांचा समावेश आहे. खंडाळ्यात सर्वात कमी संख्येने बाधित आढळून आले आहेत. चार बाधितांचे मृत्यू क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मध्ये दुधणेवाडी (ता. कोरेगाव) येथील 59 वर्षीय व्यक्ती, भीमनगर (ता. फलटण) येथील 60 वर्षी व्यक्ती व जिल्ह्यातील विविध खाजगी रुग्णालयांमध्ये सांगवी (ता. खंडाळा) येथील 75 वर्षीय महिला तसेच लोणंद (ता. खंडाळा) येथील 72 वर्षीय व्यक्ती अशा एकूण चार बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

आज अखेरची स्थिती

एकूण नमुने : 4 लाख 2 हजार 104 - एकूण बाधित : 64 हजार 901 - घरी सोडण्यात आलेले 59 हजार 543 - मृत्यू : 1 हजार 902 - उपचारार्थ रुग्ण : 3 हजार 523

हेही वाचा -चोपडा येथे पाच कोरोनाग्रस्तांचा मृत्यू, ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला नसल्याचे अधीक्षकांचे स्पष्टीकरण

ABOUT THE AUTHOR

...view details