महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा : जिल्ह्यात बुधवारी कोरोनामुळे 40 जणांचा मृत्यू, 2 हजार 156 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे 40 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 हजार 156 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूची एकूण संख्या 3 हजार 529 वर पोहोचली आहे.

सातारा कोरोना अपडेट
सातारा कोरोना अपडेट

By

Published : May 26, 2021, 10:48 PM IST

सातारा -जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे 40 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 हजार 156 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूची एकूण संख्या 3 हजार 529 वर पोहोचली आहे. आज मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये जावळी 2, कराड 4, खंडाळा 4, खटाव 6, कोरेगांव 3, माण 2, पाटण 4, फलटण 2, सातारा 9 व वाई 4 यांचा समावेश आहे.

कोरोनाबाधितांचा आकडा दीड लाखांवर

आज जिल्ह्यामध्ये तब्बल 2 हजार 156 जणांना कोरोनाची लागण झाली असून, कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 1 लाख 55 हजार 490 वर पोहोचला आहे. आजच्या कोरोनाबाधितांमध्ये जावळी 94, कराड 227, खंडाळा 161, खटाव 324, कोरेगांव 181, माण 138, महाबळेश्वर 11, पाटण 81, फलटण 408, सातारा 437, वाई 82 व इतर 12 यांचा समावेश आहे.

943 नागरिकांची कोरोनावर मात

आज जिल्ह्यात 943 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र हे प्रमाण नव्याने आढळून येणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत कमी आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

हेही वाचा -शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात राज्याच्या परिस्थितीवर चर्चा

ABOUT THE AUTHOR

...view details