सातारा -जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 1 हजार 776 नवे कोरोना रुग्ण आढळले असून, 37 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर आज दिवसभरात 2379 जणांनी कोरोनावर मात केल्याची माहिती, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या, एकूण संख्या कंसामध्ये
जावळी 73 (6413), कराड 203 (19372), खंडाळा 110 (8373), खटाव 230 (11943), कोरेगांव 139 (11548), माण 173 (9088), महाबळेश्वर 26 (3662), पाटण 69 (5592), फलटण 224 (17980), सातारा 364 (30259), वाई 99 (9941 ) व इतर 16 (786) असे मिळून आतापर्यंत एकूण 134957 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत.