सातारा -जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत आज काहीप्रमाणात घट झाली आहे. दुसरीकडे मात्र टक्केवारी वाढल्याचे आढळून येत आहे. गेल्या 24 तासांत 4 हजार 89 नमून्यांपैकी 1 हजार 621 नागरिकांचे नमुने पॉझिटिव्ह निघाले आहेत.
गेल्या चोवीस तासांत सातारा जिल्ह्यात एकूण 4 हजार 89 संशयितांचे नमूने घेण्यात आले. त्यापैकी एक हजार 621 नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर मंगळवारी दिवसभरात 45 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या व आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. सातारा 11 (857), फलटण 8 (218), वाई 6 (244) , कराड 6 (511), खटाव 3 (303), कोरेगांव 3 (266), माण 2 (165), जावली 2 (129), खंडाळा 2 (100), महाबळेश्वर 1 (39), पाटण 1 (130) आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 2 हजार 962 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.