महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Tiger Trap Radhanagari Sanctuary : राधानगरी अभयारण्यात पट्टेरी वाघाचे दर्शन; चौथ्यांदा वाघ कॅमेर्‍यात कैद - राधानगरी अभयारण्य वाघ

वन विभागाकडून लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यात पट्टेरी ( Patteri tiger in Radhanagari sanctuary ) वाघाचे छायाचित्र ( tiger found ) टिपण्यात आले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या अधिवासाच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची आहे. या वाघाचे छायाचित्र सॉफ्टवेअरवर टाकून कर्नाटक व गोवा राज्यातील वाघांशी जुळवण्याचा प्रयत्न केला जणार आहे.

कॅमेऱ्यात ट्रॅप झालेला वाघ
कॅमेऱ्यात ट्रॅप झालेला वाघ

By

Published : Apr 24, 2022, 3:51 PM IST

कराड (सातारा) - वन विभागाकडून लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यात पट्टेरी वाघाचे छायाचित्र ( Patteri tiger in Radhanagari sanctuary ) टिपण्यात आले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या अधिवासाच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची आहे. या वाघाचे छायाचित्र ( tiger found ) सॉफ्टवेअरवर टाकून कर्नाटक व गोवा राज्यातील वाघांशी जुळवण्याचा प्रयत्न केला जणार आहे. जर छायाचित्रातील पट्ट्यांची रचना जुळली, तर हा वाघ स्थलांतरित होऊन आलेला आहे, असा निष्कर्ष निघणार आहे.



पूर्ण वाढ झालेला पट्टेरी वाघ कॅमेर्‍यात कैद :कॅमेरा ट्रॅपमध्ये दि. 23 एप्रिल रोजी पूर्ण वाढ झालेल्या पट्टेरी वाघाचे छायाचित्र टिपण्यात आले असल्याची माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाफचे संचालक आणि वनसंरक्षक नानासाहेब लडकत यांनी दिली आहे. प्रत्येक वाघाच्या अंगावरील पट्ट्यांची रचना निरनिराळी असते. राधानगरी अभयारण्यातील कॅमेर्‍यात ट्रॅप झालेल्या वाघाचे छायाचित्र हे सॉफ्टवेअरवर टाकून कर्नाटक व गोवा राज्यातील वाघांशी जुळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जर छायाचित्रातील वाघांच्या पट्ट्यांची रचना जुळली, तर हा वाघ स्थलांतरित होऊन आलेला असल्याचा निष्कर्ष काढण्यात येईल, असे लडकत यांनी सांगितले. राधानगरी अभयारण्यात 2012 पासून चौथ्यांदा वाघाचे छायाचित्र टिपले गेले असल्याचे वनसंरक्षक डॉ. व्ही क्लेमेंट बेन म्हणाले.


आणखी निरीक्षण करण्याच्या सूचना :राधानगरीतील वाघाचा वावर हा सह्याद्री व्याघ प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. कारण, सद्यपरिस्थतीत व्याघ्र प्रकल्पात वाघाचा वावर वा अधिवास नाही. त्यामुळे प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी आणखी निरीक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रकल्पामध्ये वाघ स्थलांतरित होण्याचा एकमेव मार्ग हा राधानगरी ते तिलारी दरम्यान असलेला सह्याद्री-कोकण वाईल्डलाईफ कॉरिडॉर आहे. अशा परिस्थितीत राधानगरी अभयारण्यात वाघाचा वावर हा सह्याद्रीतील व्याघ्र अधिवासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.


राधानगरी अभयारण्य जैवविविधतेचा हॉटस्पॉट :राधानगरी अभयारण्याला पश्चिम घाटामधील जैवविविधतेचा हॉटस्पॉट मानले जाते. या अभयारण्यात वाघाच्या वावराची नोंद आढळते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांचा अधिवास हा फार गुप्त स्वरुपाचा आहे. हाताच्या बोटाच्या मोजण्याइतकेच वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अधिवास करतात. अशा परिस्थितीत राधानगरी अभयारण्यात वाघांची झालेली नोंद महत्त्वपूर्ण आहे. वन्यजीवांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाकडून राधानगरी अभयारण्यात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत. जिल्हा वार्षिक नियोजन निधीतून कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी कॅमेरा ट्रॅप खरेदीकरिता निधी उपलब्ध करुन दिला होता. या निधीतून 100 ट्रॅप कॅमेरे खरेदी करण्यात आले होते. सर्व वन अधिकारी आणि कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देऊन जंगलात मोक्याच्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते.

हेही वाचा -Weather Forecast in India : देशात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडणार -हवामान विभाग

ABOUT THE AUTHOR

...view details