महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिलीव घाटात लुटमारीच्या उद्देशाने वाहनांवर दगडफेक; कोंबिंग ऑपरेशन लवकरच - पीलीव घाटात लुटमारीच्या उद्देशाने वाहनांवर दगडफेक

सातारा-पंढरपूर रस्त्यावर पिलीव घाटात रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात लोकांनी अंधाराचा फायदा घेऊन रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे.

throwing-stones-on-vehicles-in-piliv-ghat
throwing-stones-on-vehicles-in-piliv-ghat

By

Published : Jan 19, 2021, 11:32 PM IST

Updated : Jan 20, 2021, 1:18 AM IST

सातारा -सातारा-पंढरपूर रस्त्यावर पिलीव घाटात रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात लोकांनी अंधाराचा फायदा घेऊन रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक केली. यामध्ये ४ ते ५ वाहनांच्या काचा फुटल्या असून वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा प्रकार सोलापूर जिल्ह्यात माळशिरस पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे समजते.


पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी या घटनेस दुजोरा दिला आहे. सातारा-पंढरपूर रस्त्यावर पिलीव घाटात हा प्रकार घडला असून चोरट्यांच्या दगडफेकीत एसटीबस व मोटारसायकलसह ४-५ वाहनांचे काचा फुटून नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

घटनेबद्दल एसटीचा चालक माहिती देताना

हा प्रकार सोलापूर जिल्ह्यात माळशिरस पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच म्हसवडचे सहाय्यक निरीक्षक बाजीराव ढेकळे व पथक घटनास्थळी दाखल झाले. सोलापूर पोलिसही घटनास्थळी पोहोचले आहेत. सात ते आठ लोकांनी झाडाच्या आडून बसवर दगडफेक केली. यात बसच्या मागे मोटारसायकलीवरुन चाललेल्या युवकांच्या तोंडावर दगड लागला असल्याचे वृत्त आहे.

कोंबिग ऑपरेशन लवकरच -


लवकरच परिसरात कोंबिग ऑपरेशन सुरु होईल, असे साताऱ्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. चोरट्यांचा दरोड्याचा प्रयत्न असावा, ही शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीने पोलिस परिसरात शोध घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की साताराहून पंढरपूरकडे येणाऱ्या एसटी बसला दरोडेखोरांनी रात्री साडेदहाच्या सुमारास म्हसवड ते पिलीव येथील घाटामध्ये दगडफेक केली व एसटी बस ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दगडफेक करणाऱ्यांमध्ये पाच ते सहा जण असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या अज्ञातांनी दगडफेक करून एसटीच्या काचा फोडत बस थांबवण्याचा प्रयत्न केला.

सातारा येथून सोलापूरकडे निघालेल्या एसटी बससह इतर वाहनांनाही लुटण्याच्या उद्देशाने पाच-सहा अ अचानकपणे हल्ला करून ती थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र चालकाच्या सावधगिरीमुळे दरोडयाचा प्रयत्न फसला. यामध्ये चालकही जखमी झाला आहे. एसटी पाठीमागे असणाऱ्या दुचाकीस्वारावरही दगडफेक करण्यात आली असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.

घटनेची माहिती कळताच म्हसवड व माळशिरस पोलिस पिलीव येथील घाटामध्ये दाखल झाली व दगडफेकीनंतर दरोडेखोर ज्या दिशेने पळून गेले होते. त्या दिशेने पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

Last Updated : Jan 20, 2021, 1:18 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details