महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Satara Crime: मॉलमध्ये खळबळ; रिव्हॉल्व्हरचा ट्रीगर दबल्याने गोळी लागून सेल्समन जखमी - bullet after trigger of revolver pressed

साताऱ्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रसिध्द मॉलमध्ये ग्राहकाच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटल्याने मॉलमधील सेल्समन जखमी झाला आहे.उलफिद युसूफ खान, असे जखमी झालेल्या सेल्समनचे नाव आहे.

Satara Crime
गोळी लागून सेल्समन जखमी

By

Published : Mar 22, 2023, 12:19 PM IST

सातारा :पुणे-बंगळुरू महामार्गावर शेंद्रे (ता. सातारा) गावच्या हद्दीतील प्रियांका शू मार्ट या मॉलमध्ये ही घटना घडली आहे. पाटण तालुक्यातील गोळीबाराची घटना ताजी असतानाच सातार्‍यातील प्रसिध्द मॉलमध्ये ग्राहकाच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटल्याने मॉलमधील सेल्समन जखमी झाला.जखमी सेल्समनला तातडीने सातार्‍यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्या मांडीत गोळी घुसली आहे. या घटनेमुळे सातार्‍यात खळबळ उडाली. ग्राहकाकडून चुकून ट्रीगर दबला गेल्याने रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.



आणि... गोळी सुटली: अहमदनगर जिल्ह्यातील अभय आवटे हे आपल्या परवान्याच्या रिव्हॉल्व्हरसाठी लेदर कव्हर घेण्यासाठी प्रियांका शू मॉलमध्ये गेले होते. त्यावेळी चुकून रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर दाबला गेल्याने गोळी सुटून कामगाराच्या मांडीत घुसली. रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली गेल्याने मॉलमध्ये खळबळ उडाली. गोळीच्या आवाजाने काही काळ मॉलमध्ये पळापळही झाली. सेल्समनच्या मांडीतून रक्तस्त्राव सुरू झाल्याने त्याला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.



सातार्‍यात खळबळ: पाटण तालुक्यातील मोरणा खोर्‍यात झालेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाल्याने सातारा जिल्हा हादरला होता. त्यातच सातार्‍यातील मॉलमध्ये गोळी लागून कामगार जखमी झाल्याने सातारा जिल्हा पुन्हा हादरला. तसेच या घटनेची माहिती मिळताच सातारा ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके आणि त्यांचे सहकारी या घटनेचा अधिक तपास करत आहेत. तर सातारा जिल्ह्यात गोळीबार झाल्याने या घटनेने जिल्हा पुन्हा हादरला आहे.

नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू :या आधीही सातारा जिल्ह्यातील एकाच इमारतीत राहणाऱ्या दोन मित्रांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोरेगावमध्ये घडली मंगळवारी घडली होती .या घटनेने कोरेगावात खळबळ माजली आहे. तसेच झोक्याचा फास लागून नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. सातारा जिल्हात गुन्हे वाढत आहेत.

हेही वाचा :satara Crime News एकाच इमारतीत दोन मित्रांची आत्महत्या तर झोक्याचा फास लागून नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details