सातारा -कोरोनातून सावरत असतानाच सातारा जिल्ह्यात ( Swine flu patients found in Satara district ) आता स्वाईन फ्ल्यूने डोके वर काढले आहे. स्वाईन फ्ल्यूचे जिल्ह्यात तीन रुग्ण आढळून आल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आरफळ ( ता. सातारा), महाबळेश्वर आणि मुंबईहून आलेल्या रुग्णांमध्ये स्वाईन फ्ल्यूची लक्षणे ( Symptoms of swine flu ) आढळून आली आहेत. नागरिकांनी वेळेवर तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी केले आहे.
हेही वाचा -Excise Department: उत्पादन शुल्कची मोठी कारवाई, दारूसह साडे नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त
सात जणांच्या नमुन्यांची तपासणी -साताराजिल्ह्यामध्ये स्वाईन फ्ल्यूचा शिरकाव झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आरोग्य विभागाने चार दिवसांमध्ये सात जणांचे नमुने तपासणीसाठी पुणे प्रयोगशाळेत पाठवले. त्यापैकी आरफळ (ता. सातारा), महाबळेश्वर आणि मुंबडई येथील एक, अशा तीन जणांना स्वाइन फ्लू झाला असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे.
संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज -स्वाइन फ्ल्यूच्या विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालयांमध्ये औषधांसह यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी शिंकताना अथवा खोकताना तोंडावर रुमाल धरावा. हात स्वच्छ धुवावेत. ताप, खोकला अशी लक्षणे असल्यास तात्काळ तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी केले.
हेही वाचा -Satara Accident : साताऱ्यात चार दिवसांत तीन अपघात; ८ ठार, ५ गंभीर जखमी