महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Car Accident In Koregaon Taluka: चालकाचा ताबा सुटल्याने कार अपघात; तीघांचा जागीच मृत्यू - सातारा जिल्ह्यात सुर्ली गावाजवळ अपघात

रस्त्यातील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने कार अपघात होऊन कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल रविवारी (दि. 31 जुलै)रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास कोरेगाव तालुक्यातील सुर्ली गावच्या हद्दीत घडली. ( Car Accident In Koregaon Taluka ) साताऱ्याहून कोरेगावकडे जात असताना हा अपघात झाला आहे.

चालकाचा ताबा सुटल्याने कार अपघात झाला त्यामध्ये तीघांचा जागीच मृत्यू झाला.
चालकाचा ताबा सुटल्याने कार अपघात झाला त्यामध्ये तीघांचा जागीच मृत्यू झाला.

By

Published : Aug 1, 2022, 7:35 PM IST

सातारा - सातार्‍यातील काम आटोपून हे तीघजण कारमधून आर्वीकडे निघाले होते. सुर्ली गावच्या हद्दीत एका वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार पलटी झाली. या भीषण अपघातात तिघेही गंभीररित्या जखमी झाले. वाठार किरोली गावातील तरूण त्यांना उपचारासाठी सातारा शासकीय रूग्णालयात नेले. मात्र, वाटेतच तिघांचाही मृत्यू झाला. ( Car Accident In Satara District ) तुकाराम आबाजी माने (वय 65), तानाजी अनंत माने (वय 62) आणि सुभाष गणपत माने (वय 60), अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही आर्वी (ता. कोरेगाव) गावचे रहिवासी होते. या घटनेने आर्वी गावावर शोककळा पसरली आहे.



तीघेही प्रतिष्ठित नागरिक -कार अपघातात ठार झालेल्या तिघांपैकी दोघेजण निवृत्त शासकीय कर्मचारी तर एकजण माजी उपसरपंच होते. सुभाष माने हे सेवानिवृत्त पोलीस होते. तानाजी माने हे भूमी अभिलेख खात्यातून भू-कर मापक म्हणून निवृत्त झाले होते. तर, तुकाराम माने हे आर्वी गावचे माजी उपसरपंच होते. ( Car Accident Near Surli village ) या ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित नागरीकांचा अपघाती मृत्यू झाल्याने कोरेगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा -Shinde Government: शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी?, पावसाळी अधिवेशन लांबणीवर

ABOUT THE AUTHOR

...view details