सातारा -कराड आणि पाटण तालुक्यात आज चौघांना नव्याने कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये कराड तालुक्यात दोन, तर पाटणमधील एकाचा समावेश आहे. कराड तालुक्यातील 10 महिन्यांच्या बालकासह चार रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. आजच्या चार रुग्णांसह जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आठ झाली आहे. तर, इतर दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच एक महिला पूर्ण बरी झाली आहे.
पाटण तालुक्यातील 10 महिन्यांच्या बालकाला न्युमोनियाचा त्रास होत असल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधिका-यांना कोरोनाचा संसर्गाचा संशय आला. त्यामुळे बालकाला कराडच्या कृष्णा हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या बालकाचे वडील व काका नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईत असतात. त्यामुळे संबंधित बालकाला बाधा झाली असण्याची शक्यता वैद्यकीय सुत्रांनी व्यक्त केली.