महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मिनी बसची ट्रॅक्टरला धडक, कर्नाटकातील तिघे जखमी - कराड अपघात बातमी

चालकाचा ताबा सुटल्याने मिनी बसने ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याची घटना आज सकाळी सातच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावर मलकापूर (ता. कराड) येथील डी मार्टसमोर घडली.

accident
मिनी बसची ट्रॅक्टरला धडक

By

Published : Mar 5, 2021, 2:47 PM IST

कराड (सातारा) -चालकाचा ताबा सुटल्याने मिनी बसने ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याची घटना आज सकाळी सातच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावर मलकापूर (ता. कराड) येथील डी मार्टसमोर घडली. या अपघातात मिनी बसमधील तिघे जण जखमी झाले आहेत. त्यांना कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जोसेफ जोबीन, जोसेफ जोसवीन आणि जोसेफ बाबू (सर्व रा. कल्लापुरीमल, कर्नाटक), अशी जखमींची नावे आहेत. आकाश दादाराव भोसले (रा. समतापूर, ता. जि. बीड) हा ट्रॅक्टर घेऊन कोल्हापूर-पुणे लेनवरून कराडकडे निघाला होता. त्यावेळी पाठीमागून आलेल्या मिनी बसचा चालक नागराज एच. हनुमाप्पा याचा बसवरील ताबा सुटला आणि बसने ट्रॅक्टरला धडक दिली. या अपघातात मिनी बसमधील तिघेजण जखमी झाले. तसेच अपघातात बस आणि ट्रॅक्टरचे नुकसान झाले आहे.

महामार्गावरच अपघात झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातातील जखमींना कृष्णा रूग्णालयात दाखल केले. महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

हेही वाचा -राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी जे. जे. रुग्णालयात घेतली कोविडवरील लस

हेही वाचा -दिलासा! एक एप्रिलपासून वीज दरात 2 टक्के कपात

ABOUT THE AUTHOR

...view details