ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Lightning struck : पाचगणी पठारावर वीज कोसळून तीन घोड्यांचा मृत्यू - Lightning

पाचगणीच्या टेबल पठारावर वीज कोसळून ( Lightning struck ) तीन घोड्यांचा जागीच मृत्यू ( Three horses died on the spot due to lightning ) झाल्याची घटना समोर आली आहे. विजांच्या कडकडाटात पाऊस सुरू झाल्यानंतर घोड्यांना झाडाखाली उभे करून व्यावसायिक दूर जाऊन थांबले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

Lightning struck
Lightning struck
author img

By

Published : Oct 20, 2022, 10:57 PM IST

सातारा - पाचगणीच्या टेबल पठारावर वीज कोसळून ( Lightning struck ) तीन घोड्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ( Three horses died on the spot due to lightning ) समोर आली आहे. विजांच्या कडकडाटात पाऊस सुरू झाल्यानंतर घोड्यांना झाडाखाली उभे करून व्यावसायिक दूर जाऊन थांबले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

घोडे व्यावसायिक थोडक्यात बचावले - पाचगणीत दुपारनंतर विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे व्यावसायिकांनी घोड्यांना एका स्टॉलसमोरील झाडाखाली उभे केले आणि बाजूला जाऊन उभे राहिले. विजेचा कडकडाट होऊन वीजेचा लोळ झाडावर कोसळला. त्यात झाडाखाली उभी असलेली तीन घोड्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, घोडे व्यावसायिक थोडक्यात बचावले.

घोड्यांच्या मृत्यूने व्यावसायिक हवालदिल - सध्या दिवाळी सुट्टीमुळे पाचगणीत पर्यटकांचा ओघ वाढला आहे. व्यवसायाचे दिवस असताना वीज कोसळून घोड्यांचा मृत्यू झाल्याने घोडे व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. या घटनेत शंकर गायकवाड, संभाजी दामगुडे, सुनील कांबळे यांच्या घोड्यांचा मृत्यू होऊन साडेचार लाखा रूपयांचे नुकसान झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details