महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साता-यात एकतर्फी प्रेमातून ॲसिड फेकण्याची धमकी देणा-या तरुणाला अटक - Latest news of satara police

गत दहा वर्षांपासून विक्रम निपाने हा संबंधित युतीवर एकतर्फी प्रेम करत होता. 'तू मला खूप आवडतेस, माझे तुझावर प्रेम आहे. मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे' अशी तो युवतीला गळ घालत होता. मात्र, संबंधित युवतीने त्याला स्पष्ट नकार दिला होता.

साता-यात एकतर्फी प्रेमातून ॲसिड फेकण्याची धमकी देणा-या तरुणाला अटक
साता-यात एकतर्फी प्रेमातून ॲसिड फेकण्याची धमकी देणा-या तरुणाला अटक

By

Published : Sep 29, 2020, 8:26 AM IST

सातारा: एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन युवतीला चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी देणा-या युवकाला शहर पोलिसांनी जेरबंद केले. विक्रम बाळकृष्ण निपाने (रा. महादरे, ता. सातारा) असे त्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माहिती संबंधित २७ वर्षीय युवती साताऱ्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. गत दहा वर्षांपासून विक्रम निपाने हा संबंधित युतीवर एकतर्फी प्रेम करत होता. 'तू मला खूप आवडतेस, माझे प्रेम आहे. मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे' अशी तो युवतीला गळ घालत होता. मात्र, संबंधित युवतीने त्याला स्पष्ट नकार दिला होता.

त्यामुळे चिडलेल्या विक्रमने 'तू माझ्यासोबत लग्न केले नाहीस तर बघ मी काय करतो. तुझ्या तोंडावर ॲसिड टाकतो. मग बघतो तुझ्या बरोबर कोण लग्न करते ते', अशी युवतीला धमकी दिली.

त्यानंतर घाबरलेल्या युवतीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेत विक्रमविरोधात तक्रार दिली. शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ संशयित विक्रम निपाने याला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details