सातारा : सातारा शहरातील घरफोडीच्या गुन्ह्यात शशिकांत उर्फ बिल्डर अनंत माने (रा. मोरया हौसिंग सोसायटी, वेताळनगर, चिंचवड-पुणे) या सराईत चोरट्याला सातारा स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. सातारा आणि वडूज येथील तीन गुन्ह्यांची त्याने कबुली दिली असून त्याच्याकडून ११ लाखांचे २० तोळे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
सातारा, वडूजमध्ये घरफोड्या :सातारा जिल्हयातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या होत्या. त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी खबऱ्यांना अलर्ट केले होते. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार शशिकांत उर्फ बिल्डर अनंत माने याने साताऱ्यातील समर्थनगरमध्ये घरफोडी केल्याची माहिती खबऱ्याने दिली.
संशयिताकडून तीन गुन्ह्यांची कबुली :पोलिसांनी शशिकांत उर्फ बिल्डर अनंत माने हेयाला अटक करून चौकशी केली. चौकशीमध्ये चोरट्याने सातारा शहरात तसेच वडूज (ता. खटाव) येथे आणखी दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून
तिन्ही गुन्ह्यातील ११ लाख रुपये किंमतीचे २० तोळे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
एलसीबीची मोठी कारवाई :साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार घेतल्यानंतर समीर शेख यांनी चोरी, घरफोडीसह गंभीर गुन्ह्यातील संशयीतांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच खून, खुनाचा प्रयत्न, असे गंभीर गुन्हे नोंद असणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर तडीपारी आणि मोक्काची कारवाई देखील केली आहे.
मुलाच्या नात्याला काळिमा :पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. 26 वर्षीय तरुणाने आपल्या आईची हत्या केली. पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. मात्र या घटनेवर सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. ही घटना गुरुवारी घडली. गुरुवारी घडलेल्या घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
भांडणातून हत्या :विरारच्या फुलपाडा परिसरातील गांधी नगर कॉलनीत ४४ वर्षीय पीडित महिला मुलासोबत राहत होती. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी एका लग्न समारंभात आई आणि मुलामध्ये वाद झाला होता. क्षुल्लक कारणावरून हा वाद झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी पुन्हा भांडण सुरू झाल्यावर आरोपी मुलाने रागाच्या भरात हे कृत्य केले. विरार पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. आरोपींची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
हेही वाचा -Violation Against Somaiya : सोमय्या, बोरीकरांविरोधात विधान परिषदेत हक्कभंग सूचना