सातारा -पाटणमधील विनायक ज्वेलर्स या दुकानांमधून दिवसाढवळ्या चोरी करण्यात आली. चोरट्याने 1 लाख 20 हजार रुपयांचे चांदीचे दागिने आणि 30 हजार रुपयांची रोकड असलेली बॅग चोरली. दुकानात कोणी नसल्याचा फायदा घेत ही चोरी झाली. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून दुकान मालक अंकुश बाबुराव पिसाळ यांनी पाटण पोलिसांत याबाबत तक्रार दिली आहे.
साताऱ्यातील पाटण येथे ज्वेलर्सच्या दुकानात चोरी हेही वाचा... 'आज के शिवाजी'...काँग्रेस आक्रमक; आज राज्यभरात आंदोलन पुकारणार
या चोरीमुळे बाजारपेठेत एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटणमधील झेंडाचौकात अगदी वर्दळीच्या ठिकाणी अंकुश पिसाळ यांचे विनायक ज्वेलर्स हे दुकान आहे. यापूर्वीही दुकानात चोरीचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे पिसाळ हे सुरक्षिततेसाठी नेहमीच दुकान बंद करताना दुकानातील दागिने आणि रोख रक्कम एका बॅगेत भरून घरी नेतात. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे त्यांनी सोन्याचे दागिने तिजोरीत ठेवून उर्वरीत चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असलेली बॅग घेऊन ते घरी गेले होते.
हेही वाचा... 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' पुस्तकाचा वाद, हिंगोलीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून निषेध
सोमवारी (दि. 13) रोजी सकाळी ते दागिन्यांची आणि रोख रक्कम असलेली बॅग घेऊन दुकानात आले. दुकान उघडल्यानंतर ती बॅग त्यांनी काउंटरजवळ ठेवली आणि पाणी आणण्यासाठी रस्त्याच्या पलिकडे गेले होते. याच वेळेचा फायदा घेत चोरट्याने दुकानातील बॅग घेतली आणि तो पसार झाला. काही वेळानंतर अंकुश पिसाळ दुकानात आल्यावर दुकानातील बॅग चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा पाहिला असता, त्यांना जॅकेट घातलेला युवक बॅग घेऊन गेल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबतची माहिती पाटण पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत चोरीचा पंचनामा केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर अज्ञात युवकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे.