सातारा- जिल्ह्यात बलकवडी धरणाच्या कड्यावरून सेल्फी घेणाऱ्या तरुणाचा पडून दुदैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. अजय महांगडे (वय 23 वर्षे), त्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाचा मृतदेह धरणातून बाहेर काढण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, पसरणी गावातील काही मित्र शनिवारी (दि. 22 ऑगस्ट) गणेश चतुर्थीच्या दिवशी बलकवडी धरणावर फिरायला गेले होते. यावेळी सेल्फी काढण्याच्या नादात धरणाच्या गेटवरून सांडव्यात तोल जाऊन अजय महांगडे हा तरुण खाली पडला. दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. ही घटना घडल्यानंतर त्याच्या मित्रांनी मदतीसाठी आरडा ओरडा केला. मात्र, पाऊस आणि जोरदार वारा असल्याने लवकर मदत मिळू शकली नाही.
दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर धरणातून विसर्ग काही काळ बंद करण्यात आला होता. त्यांनतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने अजयचा मृतदेह रविवारी (दि. 23 ऑगस्ट) दुपारी बाहेर काढण्यात आला.
सेल्फी बेतली जीवावर, बलकवडी धरणाच्या कड्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू
सेल्फी काढताना एक तरुण धरणाच्या कड्यावरुन खाली पडला. यात त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी घडली असून त्याचा मृतदेह आज (रविवार) काढण्यात आला आहे.
संग्रहित छायाचित्र