कराड (सातारा) -महाराष्ट्राच्या कोणत्या माजी मुख्यमंत्र्यांनी एरोस्पेस अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले? पर्याय आहेत...सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अब्दुल रहमान अंतुले आणि यशवंतराव चव्हाण....! अमिताभ बच्चनयांनी हा प्रश्न विचारला होता सोनी वाहिनीवरील 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात. मध्य प्रदेशातील भोपाळच्या समीक्षा श्रीवास्तव हा हॉटसीटवर होत्या आणि त्यांनी या प्रश्नाचे पृथ्वीराज चव्हाण हे अचूक उत्तर देऊन 1 लाख 60 हजार रूपये जिंकले आहेत. केबीसीसारख्या लोकप्रिय कार्यक्रमाने पृथ्वीराज चव्हाण यांच्या उच्च विद्याविभूषितपणाची दखल घेतली.
सोनी वाहिनीवर प्रसारित होणार्या 'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय कार्यक्रमाला 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. दूरचित्रवाहिनीवर या कार्यक्रमाचे आतापर्यंत 13 सिझन झाले आहेत. मेगा स्टार अर्थात बीग बी अमिताभ बच्चन यांच्यामुळे या कार्यक्रमाने उंची गाठली आहे. तसेच हा कार्यक्रम घरा-घरात पोहोचला आहे. सध्या सुरु असलेल्या 'कौन बनेगा करोडपती'च्या भागात माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या संदर्भाने प्रश्न विचारला गेला. मध्य प्रदेशच्या भोपाळमधील समीक्षा श्रीवास्तव या हॉटसीटवर होत्या. 1 लाख 60 हजार रकमेसाठी हा प्रश्न होता.
महाराष्ट्राच्या कोणत्या माजी मुख्यमंत्र्यांचे एरोस्पेस अभियांत्रिकीचे शिक्षण झालेले आहे, या प्रश्नासाठी समीक्षा श्रीवास्तव यांना सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अब्दुल रहमान अंतुले, यशवंतराव चव्हाण हे चार पर्याय देण्यात आले होते. समीक्षा यांनी तज्ज्ञाच्या (लाईफ लाईन) मदतीने पृथ्वीराज चव्हाण हे बरोबर उत्तर देऊन 1 लाख 60 हजार रुपये इतकी धनराशी जिंकली.
सोनीसारख्या हिंदी वाहिनीवरील केबीसी या लोकप्रिय कार्यक्रमात कराडच्या पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या उच्चशिक्षित नेतृत्वाची दखल घेण्यात आली. स्वच्छ प्रतिमेसोबतच उच्च शिक्षित म्हणून त्यांची देशभर ओळख आहे. मेगा स्टार अर्थात बिग बी अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नावर भोपाळच्या समीक्षा श्रीवास्तव यांनी पृथ्वीराज चव्हाण हे उत्तर देऊन 1 लाख 60 रूपये जिंकले. पृथ्वीराज चव्हाण यांनी बर्कले येथील युनिव्हसिटी ऑफ कॅलिफोर्नियातून एमएसची डिग्री घेण्याआधी राजस्थानमधील नावाजलेल्या बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स म्हणजेच बिट्स पिलानीमधून इंजिनिरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते, असे अमिताभ बच्चन यांनी सांगितले. केबीसीसारख्या लोकप्रिय कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नामुळे राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात देखील उत्साहाचे वातावरण आहे.
हेही वाचा -पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेस कार्यकारिणीत साताऱ्यातील पाच जण