महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Koyna Dam: कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 5 टीएमसीने वाढ, महाबळेश्वरमध्ये 270 मिलीमीटर पाऊस - Koyna Dam

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात झालेल्या उच्चांकी पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 5 टीएमसीने वाढ झाली आहे. ( Water storage In Koyna Dam ) एका दिवसात 4.70 टीएमसी पाण्याची आवक झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा 43.18 टीएमसी झाला आहे. महाबळेश्वरमध्ये विक्रमी 270 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 5 टीएमसीने वाढ
कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 5 टीएमसीने वाढ

By

Published : Jul 14, 2022, 5:23 PM IST

सातारा - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात झालेल्या उच्चांकी पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 5 टीएमसीने वाढ झाली आहे. ( The water level of Koyana Dam has increased ) एका दिवसात 4.70 टीएमसी पाण्याची आवक झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा 43.18 टीएमसी झाला आहे. महाबळेश्वरमध्ये विक्रमी 270 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 5 टीएमसीने वाढ

कोयना धरणातील आवक वाढली -धरणाच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणात प्रतिसेकंद 55,182 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. ( Koyna Dam has increased by 5 TMC ) वाढलेली आवक आणि पावसाचा जोर पाहता कोयना धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचा पायथा वीजगृह बुधवारी (दि. 13) सायंकाळी कार्यान्वित करून 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. अतिवृष्टीचा इशारा आणि वाढती आवक पाहता पायथा वीजगृहातील विसर्ग आणखी वाढू शकतो.

हाबळेश्वरमध्ये विक्रमी पावसाची नोंद -गेल्या चोवीस तासात धरण पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्वर येथे विक्रमी 270 टीएमसी पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वेण्णा लेक ओव्हरफ्लो झाला आहे. वेण्णा लेकचे पाणी महाबळेश्वरमधीर रस्त्यावर आल्याने रस्ता जलमय झाला आहे. महाबळेश्वरनंतर नवजा येथे 121 मिलीमीटर आणि कोयनानगर येथे 112 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणात सध्या 43.18 टीएमसी आणि पाणी पातळी 2099 फूट इतकी झाली आहे.

अतिवृष्टीच्या इशार्‍यामुळे प्रशासन सतर्क -हवामान विभागाने सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे कोयना धरण व्यवस्थापन आणि सातारा जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. अतिवृष्टीमुळे नद्यांच्या पाणीपातळीत देखील वाढ होऊ शकते. तसेच, धोकादायक भागांवर लक्ष ठेवण्यात आला आहे. भुस्खलनाची शक्यता असणार्‍या ठिकाणच्या नागरीकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यावर प्रशासनाचा भर दिसत आहे.

हेही वाचा -Made a Raincoat For The Goat: शेळ्यांची अशीही काळजी! रिकाम्या प्लॅस्टिकच्या गोणीचे शिवले रेनकोट

ABOUT THE AUTHOR

...view details