साताराकोयना धरण पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे पाणीसाठ्याची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. धरणात सध्या प्रतिसेकंद 25 हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाणीसाठा 96.54 टीएमसी झाला आहे. पाणलोट क्षेत्रातील पाऊस आणि आवक पाहता धरणाचे दरवाजे 3 फुटांवर स्थिर ठेऊन 21399 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
24 तासात सव्वा दोन टीएमसी पाण्याची आवकसातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरू असल्याने कोयना धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात कोयना धरणात सव्वा दोन टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. अजुन पाऊसकाळ शिल्लक असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे तीन फुटांनी उघडण्यात आले आहेत. 6 वक्र दरवाजातून 21 हजार 399 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.