सातारा- व्याजासह मुद्दलाची रक्कम परत मिळावी यासाठी कुटुंबाकडे लावलेला तगादा आणि वारंवार मिळत असलेल्या धमक्यांना कंटाळून वडुज येथील कापड व्यावसायिक वैभव पवार यांनी बारा जणांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
साताऱ्यात पैशांसाठी कापड व्यावसायिकाला धमक्या, 3 जणांना अटक - businesssman
वारंवार मिळत असलेल्या धमक्यांना कंटाळून वडुज येथील कापड व्यावसायिक वैभव पवार यांनी बारा जणांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कापड व्यावसायिक असलेले वैभव जगन्नाथ पवार हे शेतकरी चौकातील विशाल गारमेंट्स हे दुकान चालवतात. वीस वर्षापासून त्यांचा व्यवसाय सुरू आहे. २०१६-१७ पासून कापड व्यवसायात मंदी आल्याने ते तोट्यात जाऊ लागले, व्यापाऱ्यांचे पैसे देण्यासाठी २०१६ पासून वैभव पवार यांनी व्याजाने पैसे घेण्यास सुरुवात केली. त्यांनी ते व्याजाचे पैसे आणि रकमेपोटी व्याज व मुद्दलाची रक्कम वेळेत परतही केली.
तरी सुद्धा त्यांना मोबाईलवरून व्याजाने दिलेल्या पैशासाठी वारंवार दमदाटी आणि शिवीगाळ करण्यात येत असे. तसेच, फिर्यादीच्या पत्नीसही रस्त्यामध्ये भेटून शिवीगाळ करून व्याजाचे पैसे आणून दे अशी धमकी आरोपींनी दिली.
या प्रकरणी, अंकुश शिंगाडे, आशिष बनसोडे ,आकाश जाधव, बकाशा जाधव, गणेश गोडसे, अंकुश तुपे, रामभाऊ काळे, संग्राम उर्फ बबन गोडसे, विनोद पवार, सलमा डांगे, सचिन शिंदे, अरुण कणसे, या बारा जणांविरोधात वडूज पोलीस ठाण्यात खासगी सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघांना अटक करून न्यायालायापुढे हजर केले असता त्यांना १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.