सातारा -साताऱ्यासह पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात १४ गुन्हे दाखल असलेल्या व चार वर्षांपासून फरार असलेल्या चोरट्यास अटक करण्यात सातारा तालुका पोलिसांना यश आले आहे. या आरोपीला पुण्यामधून अटक करण्यात आली. इंद्रजित मोहन गुरव (वय ३०, रा. कोंडवे, ता. सातारा) असे त्याचे नाव आहे. या चोरट्यासोबतच त्याच्याकडून चोरीचा लॅपटॉप विकत घेणाऱ्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
चार वर्षांपासून फरार असलेल्या चोरट्याला अटक - सातारा क्राईम न्यूज
साताऱ्यासह पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात १४ गुन्हे दाखल असलेल्या व चार वर्षांपासून फरार असलेल्या चोरट्यास अटक करण्यात सातारा तालुका पोलिसांना यश आले आहे. या आरोपीला पुण्यामधून अटक करण्यात आली. इंद्रजित मोहन गुरव (वय ३०, रा. कोंडवे, ता. सातारा) असे त्याचे नाव आहे. या चोरट्यासोबतच त्याच्याकडून चोरीचा लॅपटॉप विकत घेणाऱ्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
४ वर्षांपासून आरोपी होता फरार
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सजन हंकारे यांना रेकॉर्डवरील फरार संशयितांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक हंकारे यांनी कारवाई केली. या कारवाईदरम्यान फरार आरोपी इंद्रजित गुरव हा पुण्यामध्ये असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्याला पुण्यामधून ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर सातारा शहर, सातारा तालुका, शाहूपुरी, वाई व बारामती पोलीस ठाण्यात जबरी चोरी, चोरी, घरफोडी व आर्म अॅक्ट असे विविध गुन्हे दाखल आहेत. गेल्या चार वर्षांपासून हा आरोपी फरार होता, अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करून त्याला अटक केली. त्याच्याकडून चोरीचा लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे.