कराड (सातारा) : माजी खासदार आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या निधनाने वंचितांचा आधार हरपला आहे. त्यांच्या निधनामुळे सातारा जिल्ह्याने देखील आपला सुपुत्र गमावला आहे, अशा शब्दांत सातार्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी एकनाथ गायकवाड यांना श्रध्दांजली वाहिली आहे.
एकनाथ गायकवाड हे मूळचे कोंढवे (ता. सातारा) येथील रहिवासी होते. व्यवसायानिमित्त ते मुंबईला गेले आणि तेथेच स्थायिक झाले. धारावीसारख्या भागात त्यांनी सामाजिक कार्याला सुरूवात केली, त्यानंतर ते राजकारणात उतरले. तेथेही ते यशस्वी ठरले. त्यांची राजकीय कारकीर्द बहरत गेली. कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जाणारे नेते अशी त्यांची ओळख होती.