सातारा- विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपकडे माढ्यातून उमेदवाराची मागणी केली होती, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी केला आहे. शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपची उमेदवारी निश्चित झाली होती. त्याच वेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती. उमेदवारीसाठी 3 आमदारांचा भाजप प्रवेश घडवून आणण्यास व साताऱ्याची जागा निवडून आणण्याचा शब्द दिला होता. त्याबाबत लोणावळा येथे एकत्र बैठक देखील होणार होती, असे आमदार जयकुमार गोरे यांनी सांगितले आहे. यावेळी रामराजे यांच्या राजकीय कारकीर्दीचा अस्त होण्यास सुरुवात झाली असून, लोकसभेपाठोपाठ फलटणमध्ये काय होतं ते तुम्ही पाहाल, असे देखील आमदार गोरे यांनी पत्रकारांना सांगितले