महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यात बँकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर - satara bank robbery

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची पुसेसावळी (ता. खटाव) येथे शाखा आहे. या शाखेत रविवारी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी संपूर्ण बँकेची माहिती घेतल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर येत आहे.

satara
सातारा जिल्ह्यात बँकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

By

Published : Jan 4, 2020, 6:05 PM IST

सातारा - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पुसेसावळी (खटाव) शाखेत रविवारी अज्ञात व्यक्तींनी धाडसी दरोडा टाकल्याची घटना घडली. या दरोड्यात बँकेतील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे १ कोटी ६५ लाख ९६ हजार १५९ रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला. या घटनेमुळे सातारा आणि सांगली जिल्हा परिसरात एकच खळबळ उडाली असून बँकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सातारा जिल्ह्यात बँकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

हेही वाचा -'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले' पुरस्काराचे साताऱ्यात वितरण

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची पुसेसावळी (ता. खटाव) येथे शाखा आहे. या शाखेत रविवारी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी संपूर्ण बँकेची माहिती घेतल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर येत आहे. बँकेचा परिसर हा वर्दळीचा नाही. सुट्ट्यांच्या दिवशी तर इथे माणसांची तुरळकच ये-जा असते. त्यामुळे बँक नेमकी कुठे आहे हे शोधावे लागते. याचाच फायदा घेत चोरट्यांनी शनिवार आणि रविवार या दोन दिवशी बँक बंद असल्याचा फायदा घेतला.

हेही वाचा -मिरजेत खून करून पळालेले दोघे कराड पोलिसांच्या ताब्यात

बँकेच्या स्ट्राँग रुममधील लोखंडी तिजोरी गॅस कटरच्या सहाय्याने कापून चोरट्यांनी यातील १ कोटी १८ लाख ४५ हजार ५४० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ४७ लाख ५० हजार ६१९ रुपयांची रोकड लंपास केली. दरम्यान, चोरट्यांच्या शोध घेण्यासाठी साताऱ्याहून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. पोलीस बँक आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरुन पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा -सावित्रीबाई फुले जयंती : क्रांतीज्योतींच्या जन्मगावी उत्साह

कराड येथील शेणवली बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखे वरती दिवसा पडलेला दरोडा तसेच खटाव तालुक्यातील एटीएम चितळी येथील बँक गॅस कट्टरच्या साह्याने कट करून लाखो रुपयांचा पोबारा करण्यात आला होता. मात्र, यावर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी सुरक्षा व्यवस्था आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी पत्र व्यवहार करून देखील या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षा रक्षक नेमले गेले नाहीत. त्यामुळे ह्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details