सातारा - थंड हवेचे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पाचगणी गिरिस्थानला आतापर्यंत पर्यटनस्थळाच्या वर्गवारी स्थान मिळाले नव्हते. आजच राज्य शासनाने ब वर्ग पर्यटनस्थळ म्हणून मान्यता दिल्याने पाचगणीच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. यासाठी नगराध्यक्ष लक्ष्मी कराडकर व तत्कालीन मुख्याधिकारी अमिता दगडे यांनी विशेष प्रयत्न केले होते.
पाचगणीला 'ब' वर्ग पर्यटनस्थळ स्थळाचा दर्जा; विकासासाठी निधी मिळणार - पाचगणी शहर बातमी
पाचगणी गिरिस्थानला 'ब' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा सरकारने दिला आहे. यामुळे विकस कामांसाठी विशेष उपलब्ध होणार असून पर्टनाला आणखी चालना मिळणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे फेब्रुवारी महिन्यात कुटुंबियांसमवेत महाबळेश्वर येथे खासगी दौऱ्यानिमित्त आले होते. त्यांनी पाचगणीच्या पर्यटन स्थळाची देशात वेगळी ओळख हवी, असे सांगत शहराच्या सर्वांगीण विकासाच्या संदर्भात पर्यावरणाला धक्का न लावता पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले होते. त्यानुसार या पर्यटनस्थळी पर्यटन क्षमता विचारात घेता एक विशेष बाब म्हणून पाचगणी नगरपालिका क्षेत्रात ब वर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे महाबळेश्वर व पाचगणीचे पर्यटनदृष्ट्या महत्व अधोरेखित झाले आहे.
हेही वाचा -खासदार उदयनराजे अवमान प्रकरण : प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल