महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या" बालिकेची प्रकृती स्थिर, खासगी दवाखान्यात घेते उपचार - सातारा क्राईम

आठ वर्षे वयाच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून, तिला चालत्या रेल्वेतून ढकलून देण्याचा प्रकार आदर्की ते वाठार स्टेशन दरम्यान सोमवारी मध्यरात्री घडला पोलिसांनी संशयित प्रभु मल्लाप्पा उपहार (वय ३३, रा. संगळ पो. सुमधूर, जि. बेळगाव) याला अटक केली आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

By

Published : Jun 3, 2021, 12:58 AM IST

सातारा - आठ वर्षे वयाच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून, तिला चालत्या रेल्वेतून ढकलून देण्याचा प्रकार आदर्की ते वाठार स्टेशन दरम्यान सोमवारी मध्यरात्री घडला होता. यामध्ये बालिका जखमी झाली होती. या प्रकारानंतर रेल्वे पोलीस व पुणे पोलिसांनी काही तासांतच संशयितास भुसावळ येथे रेल्वे थांबून अटक केली. प्रभु मल्लाप्पा उपहार (वय ३३, रा. संगळ पो. सुमधूर, जि. बेळगाव) असे संशयिताचे नाव आहे. तो सैन्यदलात झांसी येथे कार्यरत आहे. या मुलीला धावत्या रेल्वेतून फेकून दिल्याने ती गंभीर जखमी झाली होती. तीला बुधवारी जिल्हा शासकीय रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. या बालिकेची प्रकृती स्थिर असून, मुलीसोबत तिचे पालक आणि कुटुंबीय असल्याचे पोलिसांनी सांगितले.


'प्रकृतीला धोका नाही'

जखमी पीडित बालिकेला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एक दिवस तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात आले. मात्र, तिच्या पालकांनी मुलीला साताऱ्यातील खासगी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. बुधवारी दुपारी मुलीला खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. आता तीची प्रकृती स्थिर असून, ती उपचाराला प्रतिसाद देत आहे. तिच्या प्रकृतीला कोणाताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी सागितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details