महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Koyna Dam: कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून होणारा पाण्याचा विसर्ग बंद - Koyna dam is stopped

कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस थांबल्याने धरणातील पाण्याची आवक घटली आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातील विसर्ग बुधवारी सायंकाळी बंद करण्यात आला आहे. धरणात सध्या 64.32 टीएमसी पाणीसाठा असून धरणात प्रतिसेकंद 3,958 क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून १३ दिवसांनी पाण्याचा विसर्ग बंद
कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून १३ दिवसांनी पाण्याचा विसर्ग बंद

By

Published : Jul 28, 2022, 2:54 PM IST

सातारा - कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस थांबल्याने धरणातील पाण्याची आवक घटली आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातील विसर्ग बुधवारी सायंकाळी बंद करण्यात आला आहे. धरणात सध्या 64.32 टीएमसी पाणीसाठा असून पाण्याची आवक प्रतिसेकंद 3,958 एवढी होत आहे.

धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची दडी -कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मागील सह दिवसांपासून पावसाचा जोर पुर्णतः ओसरला आहे. कालपासून तुरळक पाऊस पडत आहे. पावसाने दडी मारल्याने कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून सुरू असलेला 2100 क्युसेक विसर्ग बुधवारी सायंकाळी बंद करण्यात आला आहे.

१३ दिवसांपासून सुरू होता विसर्ग - मागील पंधरा दिवसांपुर्वी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणातील आवक झपाट्याने वाढत होती. शिल्लक पाऊसकाळ आणि पावसाचा वाढता जोर पाहून पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरण व्यवस्थापनाने पायथा वीजगृह कार्यान्वित केले. सुरूवातीला 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला. पावसाचा जोर आणि आवक वाढू लागल्याने विसर्ग 2100 क्युसेक करण्यात आला होता. पाऊस थांबल्याने विसर्ग बंद करण्यात आला आहे.

धरणात समाधानकारक पाणीसाठा - कोयना धरणात सध्या 64.32 टीएमसी इतका समाधानकारक पाणीसाठा आहे. धरणातील पाण्याची पातळी 2123 फूट 6 इंच झाली आहे, तर पाण्याची आवक 3,958 क्युसेकवर आली आहे. अद्याप पाऊसकाळा शिल्लक असल्यामुळे चिंतेचे वातावरण नाही. बुधवारी दिवसभरात कोयनानगर, नवजा येथे अवघा १ मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे ३ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

हेही वाचा -Asia Cup 2022: आशिया चषक '२०२२' स्पर्धेचे ठिकाण बदलले; UAE येथे होणार असल्याची जय शाहांची घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details